मला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर

2

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रेम ही एक अशी संकल्पना आहे जी लोक मरे पर्यंत अनुभवत असतात. त्याला कोणतेही बंधन नसते. ते वाऱ्यासारखे आणि पाण्याप्रमाणे संथ वाहत असते. अशाचं भावनांना उजाळा देणारं झी म्युझिक प्रस्तुत आणि एम. सुधाकर निर्मित मराठी व्हिडीओ ‘क्षितिजा परी’ नुकताच मराठीतील आघाडीचा अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध असे कोरिओग्राफर म्हणून ओळखले जाणारे एम. सुधाकर यांनी या गाण्यातून प्रथमच मराठीत पदार्पण केले आहे.

दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध असे कोरिओग्राफर म्हणून ओळखले जाणारे एम. सुधाकर ह्यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना कोरिओग्राफ केले आहे. मराठी सृष्टीत त्यांनी ‘क्षितिजा परी’ या व्हिडिओतून प्रथमच पदार्पण केले आहे. ‘मराठी संस्कृती, तिथली माणसं, त्यांची आपुलकी मला खूप आवडतात आणि इतके वर्ष मुंबईमध्ये राहिल्यानंतर हे सर्व मलाआपलंस वाटू लागलंय त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत मी पदार्पण केलं. असं सुधाकर सांगतात.

‘ क्षितिजा परी ‘ म्युझिक व्हिडीओ दुर्गेश पाटील या उमद्या गायकाच्या आवाजात स्वरबद्ध केला असून, त्याच्यावरच हे गाणं चित्रित करण्यात आलयं. महेश मटकर यांच्या संगीताने सजलेल्या या व्हिडिओचे कॅमेरामॅन सोनी सिंग आहेत. तसेच पूजा ठाकूर ही अभिनेत्री या व्हिडीओत दिसते.