राहुल गांधींची न्यायालयात माफी पण जाहीर सभेत पुन्हा ‘चौकीदार चोर हैं’चा नारा

1
rahul-gandhi

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

 ‘चौकीदार चोर हैं’ हे आता सर्वोच्च न्यायालयालाही मान्य आहे. या टीकात्मक वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बोलण्याच्या ओघात न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना आपल्याकडून चुकीचे वक्तव्य गेल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत नवीन सादर करण्यात आलेली कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना न्यायालयाचा हवाला देत ‘चौकीदार चोर हैं’ हे न्यायालयानेदेखील मान्य केले आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर आक्षेप घेत भाजपने अवमान याचिका दाखल केली होती.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावत ‘चौकीदार चोर  हैं’ या वक्तव्याबाबत 22 एप्रिलपर्यंत संदर्भासह स्पष्टीकरण द्या अशा आशयाची नोटीस बजावली होती. प्रतिज्ञापत्राद्वारे या नोटिसीला दिलेल्या 27 पानी उत्तरात हे कक्तक्य राजकीय प्रचाराच्या ओघात चुकीने आपल्याकडून झाले, मात्र राजकीय किरोधकांनी त्याचा गैरअर्थ काढला.  मी हे वक्तव्य जाणूनबुजून, हेतुपुरस्सर केले असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. माझ्या मनात तसे काही नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. आता या प्रकरणाकर मंगळकार, 23 एप्रिल रोजी सुनाकणी होणार आहे.

आधी काय म्हणाले – राफेल प्रकरणात नव्याने सादर करण्यात आलेले दस्तावेज सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरत याबाबतची पुनर्विचार याचिका स्वीकारली आहे. यावरून ‘चौकीदार चोर हैं’ न्यायालयानेही मान्य केल्याचे स्पष्ट होत आहे.

आता काय म्हणतात – मी पंतप्रधानांना चोर म्हणालो नाही, ‘चौकीदार चोर हैं’ ही आमची राजकीय घोषणा आहे. निकडणुकीच्या तापलेल्या काताकरणात बोलण्याच्या ओघात निर्देशांबाबत बोलताना चुकीचे किधान केले.