जेव्हा ख्रिस गेल बनतो लैला…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्या तुफान फलंदाजीने क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय असललेल्या क्रिकेटपटू ख्रिस गेल याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो चक्क लैला ओ लैला या गाण्यावर नाचताना दिसत आहे. खरंतर ख्रिसला नाचताना पाहणं ही काही तशी विशेष गोष्ट नाही. पण, हिंदी न येणाऱ्या ख्रिसला हिंदी गाण्यावर नाचताना पाहणं हा मात्र एक धमाल अनुभव ठरत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना ख्रिसने आपल्या चाहत्यांसाठी याच गाण्यावर नाचण्याचं आव्हानही दिलं आहे. या आव्हानाला पुरं करणाऱ्या व्यक्तीला ५ हजार डॉलर्स (सव्वा तीन लाख रुपये) देण्यात येणार आहेत. २४ जुलै रोजी या आव्हानाच्या विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे.

पाहा ख्रिसचा हा धमाल डान्स-