#INDvWI वन डे व टी-20 मालिकेपूर्वी मोठा धक्का, स्फोटक फलंदाज बाहेर

74

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत यजमान हिंदुस्थानने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. दुसरा कसोटी सामना हैदराबाद येथे 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेनंतर एक दिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतून आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याने खासगी कारणास्तव माघार घेतली आहे. यामुळे वेस्ट इंडिजला मोठा धक्काबसला आहे.

शाकाहाराने खेळात सुधारणा झाली! खवय्या कोहलीची कबुली

गेलच्या गैरहजेरीमध्ये वेस्ट इंडिज संघाने तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे अध्यक्ष कर्टनी ब्राऊन यांनी सोमवारी दिली. तसेच ख्रिस गेल हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या दौऱ्याला मुकणार असल्याचेही त्यांनी सागितले. परंतु त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी गेल उपलब्ध असेल असेही त्यांनी सांगितले.

पोपटाचा ‘वाघ’ झाला! दुबळ्या विंडीजवर हिंदुस्थानचा सहज विजय

वेस्ट इंडिजने आगामी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने तीन तरुण खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. चंद्रपाल हेमराज, फेबियन एलेन आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांना संघात स्थान मिळाले आहे. तसेच केरॉन पोलार्ड, डॅरेन ब्रावो आणि आंद्रे रसेल यांनी टी-20 संघात पुनरागमन केले आहे. एक दिवसीय संघाची कमान जेसन होल्डर तर टी-20 ची कमान कार्लोस ब्रेथवेटच्या हाती असणार आहे.

वन डे साठीचा संघ :
जेसन होल्डर (कर्णधार), फेबियन एलेन, सुनील अंबरीश, देवेंद्र बिशू, चंद्रपाल हेमराज, शिमरोन, शाई होप, अलजारी जोसेफ, एविन लुइस, एश्ले नर्स, कीमो पॉल, रोवमॅन पॉवेल, केमार रोच, मार्लोन सॅमुअल्स, ओशाने थॉमस.

टी-20 साठीचा संघ :
कार्लोस ब्रैथवेट (कर्णधार), फेबियन एलेन, डॅरेन ब्रावो, शिमरोन, एविन लुइस, ओबेड मॅकाय, एश्ले नर्स, कीमो पॉल, खारी पियरे, केरॉन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, शेरफाने रदरफोर्ड, ओशाने थॉमस.

आपली प्रतिक्रिया द्या