रोजची देवपूजा महत्त्वाची

आई-वडील आणि रंगदेवता यांच्यावर अढळ श्रद्धा… सांगताहेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी

देव म्हणजे ?
देव आधी त्यानंतर माझे आई-वडील, त्यानंतर मी ज्याच्यासाठी काम करते ती माझी रंगभूमी, रंगदेवता आणि अभिनय.

आवडते दैवत ?
गणपती बाप्पा माझा लाडकाच आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ आवडतात. मी आवडत्या दैवताविषयी विभाजन करू शकत नाही. माझ्या देवाऱ्ह्यात स्वामी, गजानन महाराज, मंगेश-महालक्ष्मी, श्रीकृष्ण सगळेच आहेत.

आवडती प्रार्थना
रोज गणपती स्त्रोत्र, महालक्ष्मी स्तोत्र, स्वामींचं स्त्रोत्र म्हणते. पूजेच्या वेळी प्रार्थना करते. देवाला अष्टगंध, कुंकू, फूल वाहणे, आंघोळ घालणे, नंदादीप लावणे अशी यथासांग पूजा करते. पूजा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही.

दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का ?
आहे, कारण पवित्र रिश्ताच्या चित्रीकरणावेळी मला उशीर झाला. तेव्हा माझी कपड्याची बॅग मी घरीच विसरले. त्या दिवशी उशीर झाल्याने देवपूजा केली नव्हती. नंतर प्रवासात पिशवी विसरल्याचं लक्षात आलं. पुन्हा जोगेश्वरीला उतरून दुसऱ्या ट्रेनने सांताक्रुझला घरी जाऊन बॅग घेतली. देवपूजा न केल्याची शिक्षा मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत काहीही झालं तरी देवपूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही.

धार्मिक स्थळ?
प्रत्येक धार्मिक स्थळ आवडतं. मंगेशी, अक्कलकोट आवडतं.

आवडते देवाचं गाणं?
कोणतंही आवडतं.

धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का ?
वाचनाची आवड नाही. स्त्रोत्र फक्त पाठ करते.

आवडता रंग?
निळा, आकाश, गुलाबी.

अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं?
देवपूजा.

देवावर किती विश्वास आहे ?
देवाला मानते. विश्वास आहे की नाही माहीत नाही.

दुःखी असता तेव्हा ?
घरात एकटीच असल्यामुळे रडत बसते. ज्या गोष्टीमुळे दुःख झालंय म्हणून देव मला का छळतोय त्याचा विचार करते.

मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना?
मूर्तिपूजेबरोबर प्रार्थना. फक्त मूर्तिपूजा नाही किंवा फक्त प्रार्थनाही नाही.