ठाणेकरांवरील मालमत्ता कराचे ओझे उतरले

48

सामना ऑनलाईन, ठाणे

लाखो ठाणेकरांवरील मालमत्ता कराचे ओझे  शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर उतरले असून हा कर ३४ टक्क्यांवरून १९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जल लाभ, मलनिस्सारण कर व रस्ता कर यात घसघशीत सवलत दिल्याने मालमत्ता कर कमी झाला असून सध्याच्या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

२०१७-१८ च्या आर्थिक वर्षात ठाणेकरांच्या मालमत्ता करात ३४ टक्के एवढी करवाढ करण्यात आली होती. महासभेत त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी  ठाणेकरांची बाजू लावून धरली. एवढेच नव्हे तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या करवाढीचा पुनर्विचार करून शहरातील लाखो नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर कमी केला आहे.

विस्थापितांचे घरभाडे माफ

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या रस्तारुंदीकरणात अनेक जण विस्थापित झाल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था रेंटल हौसिंगमध्ये करण्यात आली आहे. प्रकल्पबाधित असूनही त्यांच्याकडून घरभाडे आकारले जात होते. ते माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या विषयावरून महासभेत चांगलीच खडाजंगी उडाली होती. या निर्णयामुळे विस्थापितांना न्याय मिळाला आहे.

असा भरावा लागेल कर

मालमत्ता करांतर्गत विविध प्रकारचे कर नागरिकांना भरावे लागत होते.  ३४ टक्के मालमत्ता कराच्या दरवाढीपैकी निवासी भागाकरिता १९ टक्के तर बिगरनिवासी मालमत्ताधारकांसाठी ३१ टक्क्यांवरून १६ टक्के दरवाढ कमी केली आहे. रस्त्याच्या करातील दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात या करांचा दर पुढीलप्रमाणे ः

  • जल लाभ कर- १७ टक्के
  • मलनिस्सारण लाभ कर- १४ टक्के
  • मलनिस्सारण कर – १० टक्के
आपली प्रतिक्रिया द्या