नितळ चेहरा

  • फास्ट फूडमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात. यामुळे मुरुमे येतात.
  • रासायनिक द्रव्यांचा संसर्ग होऊन मुरुमं होऊ शकतात.
  • बॉडी लोशन सतत वापरल्यास मुरुमांची समस्या निर्माण होऊ शकते.
  • घामामुळे छिद्रे बंद होतात. यामुळे चेहऱयावर मुरमे होतात.
  • धूम्रपान केल्याने त्वचेला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे मुरुमं, सुरकुत्या येऊ शकतात.
  • अतिगोड खाल्ल्यानेही मुरुमांचे एक कारण होऊ शकते.
  • जिमला गेल्यावर वा धावल्यामुळे अनेक जिवाणू शरीरावर जमा होतात. अशावेळी आंघोळ न केल्याने मुरुमे-पुरळ येतात.
  • चेहऱ्यावर मुरुमं येण्याचं कारण म्हणजे आहारात मसालेदार पदार्थांचा जास्त समावेश असणं. यामुळे त्वचेची जळजळही होते.
  • केस वेळच्या वेळी न धुतल्याने केसात कोंडा होतो. यामुळे त्वचेवरील पोर्स बंद होऊ लागतात आणि चेहरा तसेच पाठीवरही मुरमं येतात.