स्वच्छ… कोरडे राहा!

  • टोमॅटोमध्ये अँण्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यामुळे त्वचेवरील छिद्रे आकुंचित होतात. त्यामुळे घाम कमी येऊन शरीराला थंडावा मिळतो. याकरिता उन्हाळ्यात दररोज टोमॅटोचा रस प्या.
  • १० ग्रॅम कापूर नारळाच्या तेलात टाकून तयार केलेले तेल घाम जास्त येण्याच्या ठिकाणी लावावे.
  • बटाटय़ाचा चकत्या कापून त्या काखेत ठेवाव्यात तसेच घाम जास्त येण्याच्या ठिकाणी चोळाव्यात. घाम कमी करण्याचा हा सोपा उपाय असून यामुळे काळेपणाही दूर होईल.
  • दररोज द्राक्ष खाल्ल्याने घाम येण्याची समस्या दूर होऊ शकते.
  • घाम जास्त येणाऱ्या ठिकाणी बेकिंग सोडा लावा. यामुळे घाम जास्त येणार नाही.
  • हिरव्या भाज्या, बटाटे, केळी, सफरचंद असे मॅग्नेशियम असलेले पदार्थ उन्हाळ्यात भरपूर खा.