येवल्यासह सावरगाव, ठाणगाव, नांदूरला विविध उपक्रमात स्वच्छतेची शपथ

सामना ऑनलाईन | नाशिक

येवला येथील सामाजिक विकास बहु उद्देशीय सेवा भावी संस्था, नेहरू युवा केंद्र, मिलन सोशल ग्रुपच्या वतीने येथे आज स्वच्छ भारत अभियान राबवून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी संस्था अध्यक्ष अजहर शाह, मिलन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सद्दाम निम्बुवाले तसेच राष्ट्रीय युवा सेवाकर्मी अश्विनी जगदाळे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. पोलीस चौकी तसेच पेट्रोल पंप परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आली.