लातूरमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत, देशमुखांच्या राजकारणाची ‘गढी’ विस्कटली

सामना ऑनलाईन, लातूर

लातूर जिल्हा म्हणजे काँग्रेसचा गड अशी झालेली ओळख भाजपाने यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत पुसून टाकली आहे. देशमुख कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही देशमुखांना आणि काँग्रेसला यश आलं नाही. गेल्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या भाजपाने या निवडणुकीत ४१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

७० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला २८ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सुनील गायकवाड यांनी काँग्रेसला धूळ चारत विजय मिळवला होता. देशमुख कुटुंबाची आणि काँग्रेसची या जिल्ह्यावर असलेली पकड तेव्हापासूनच सैल व्हायला लागली होती. अमित देशमुख यांच्या कार्यशैलीवर नाराज काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते भाजपात सामील झाले होते. त्यांचाही भाजपाला चांगला फायदा झाल्याचं या निकालावरून दिसून येत आहे. काँग्रेसचा हा पराभव हा खऱ्या अर्थाने पक्षाचा नसून अमित देशमुख यांचा पराभव असल्याचं त्यांच्यावर नाराज असलेल्या आणि काँग्रेसमधून भाजपात सामील झालेल्या नेत्यांनी म्हटलं आहे,