मोदी सरकारपेक्षा फडणवीस सरकारचं काम चांगलं, अण्णांचं प्रशस्तीपत्रक

70

सामना प्रतिनिधी । पुणे

केंद्रातील मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारचे काम चांगले आहे असे प्रशस्तीपत्रक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले. तसेच लोकांच्या हितासाठी मी मोदींशी पत्रव्यवहार केला होता, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. मात्र आपण आपलं काम करत राहायचं आणि हिच आपली पद्धत असल्याचे ते म्हणाले. पुण्यात यशदा येथे नवीन लोकायुक्त कायदा बनवण्यासंदर्भात अण्णा हजारे आणि राज्याच्या मुख्य सचिवांमध्ये पहिली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

lokpal-meeting

देवेंद्र फडणवीस सरकारचे कौतुक करताना अण्णा हजारे पुढे म्हणतात, राज्य सरकारने लोकायुक्त कायदा करण्यासाठी 10 जणांची समिती नेमली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात लोकायुक्त निर्माण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर होईल, अशी अपेक्षा यावेळी अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. त्याच प्रमाणे फडणवीस सरकारचे कौतुक करताना त्यांच्याकडून चुका झाल्या तर आपण त्यांनाही सुनावू असेही हजारे यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या