रुग्णालयातून थेट विधानसभेत पोहचले पर्रीकर, अर्थसंकल्प केला सादर

सामना ऑनलाईन । पणजी

गेली काही दिवस लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईहून स्पेशल विमानाने पणजीत दाखल झालेल्या पर्रीकरांनी थेट विधानसभा गाठली आणि अर्थसंकल्प सादर केला. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांचे आभार मानले.

पोटदुखीच्या त्रासामुळे आठवडाभरापूर्वी पर्रीकर यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तपासणीनंतर त्यांना स्वादुपिंडाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. पर्रीकरांवर उपचारासाठी अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्याची किंवा त्यांना अमेरिकेत उपचारासाठी नेण्याची तयारी भाजप व केंद्र सरकारने केली होती.