मुंबईसाठी सीईओ शक्य नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

2

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई महानगर प्रदेशाचा नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो अंतिम करण्यात येईल. त्यातून महानगर प्रदेशाचा सुनियोजित विकास करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुंबईसाठी वेगळा मुख्य कार्यकारी अधिकारी असावा ही कल्पना चांगली असली तरी लोकशाही व्यवस्थेत ती शक्य नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सीईओ शक्य नाही म्हणून आम्ही ‘वॉर रूम’ सुरू केली. या माध्यमातून विविध प्रकल्पांच्या कामावर लक्ष ठेवले जात आहे. प्रकल्पाच्या अंमल- बजावणीसाठी येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधून हे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी अभिनेता शाहरुख खान याने मुंबईतील पायाभूत सुविधा, विविध विकास प्रकल्प, बॉलीवूडच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.  व्हिज्युअल व स्पेशल इफेक्ट आणि ऑनिमेशनच्या अभ्यासासाठी मुंबईत संस्था उभारण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीने ब्ल्यू प्रिंट तयार करावी,याला शासन सहकार्य करेल,असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.