एनडीएचा विजय, मुख्यमंत्री योगींनी केले मोदी – शहांचे अभिनंदन

yogi adityanath

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचे निकाल जसे जसे समोर येत आहे तसे एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. देशात जिथे लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत त्या उत्तर प्रदेशमध्येही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. या यशासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन केले आहे.

योगी म्हणाले की, “मोदींच्या नेतृत्वात पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. त्याचेच फळ म्हणून मोठा विजय मिळाला असून यासाठी मी त्यांचे अभिनंदन करत आहे. मोदींनी जागतिक स्तरावर हिंदुस्थानला मोठा सन्मान मिळून दिला. तसेच देशात ऐतिहासिक असे कार्य केले.” तसेच मोदींनी संधीसाधूपणा, घराणेशाहीच्या राजकारणाला जागा न दिल्याने त्यांच्या सकारात्मक राजकारणाला यश मिळाल्याचे योगींनी म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या