तब्बल 5 महिने चालणार बीसीसीआयची निवडणूक प्रक्रिया, 22 ऑक्टोबरला मतदान

597
bcci-logo
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक येत्या 22 ऑक्टोबरला होणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची (सीओए) मंगळवारी नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत त्रिसदस्यीय समितीने हा निर्णय जाहीर केला.
30 जूनपासून बीसीसीआयची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. याच दिवशी बीसीसीआयकडून निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक होईल आणि त्यांच्याकडून निवडणूक आचारसंहिता तयार करण्यात येईल. त्यानंतर प्रशासकीय समितीशी त्याबाबत सल्लामसलत करून सर्व राज्यांच्या संघटनांना कळवण्यात येईल. म्हणजेच तब्बल 5 महिने चालणार निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या