नारळाचे दूध वाढवेल केसांची वाढ, जाणून घ्या कसे वापरावे

केस निरोगी ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारची उत्पादने वापरतात. महाग असण्याव्यतिरिक्त या उत्पादनांमध्ये कधीकधी हानिकारक रसायने असतात. ज्यामुळे केसांना हानी पोहोचते. अशा स्थितीत केसांना निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक नियमितपणे खोबरेलच्या तेलाने मालिश करतात. खोबरेल तेल केसांना पोषण देऊन मजबूत करण्यास मदत करते. पण तुम्हाला माहित आहे का खोबरेलच्या तेलाशिवाय नारळाच्या दुधाचाही केसांसाठी वापर केला जाऊ शकतो.

नारळाचे दूध केसांच्या अनेक समस्यांवर उपाय ठरू शकते.नारळाचे दूध कोणत्याही कंडिशनरप्रमाणेच काम करू शकते.
त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे तुमच्या केसांची वाढ वाढवू शकतात.या शिवाय केसांना नारळाचे दूध लावण्याचे अनेक फायदे आहेत.

केसांसाठी नारळाचे दूध कसे बनवायचे

आपण केसांसाठी नारळाचे दूध अनेक प्रकारे वापरू शकतो, आपल्याला प्रथम ते कसे तयार करावे हे माहित असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सर्वप्रथम तुम्हाला ओलं खोबरे किसून घ्यावे आणि नंतर त्याचे दूध काढावे लागेल. यानंतर तुम्ही या दूधात मध, कोरफड आणि दही यांसारख्या गोष्टी मिक्स करून केसांना लावू शकता. तुमचे केस गुंतत असतील तर ही समस्या दूर करण्यास मदत होऊ शकेल.

नारळाचं दूध कसे वापरायचे
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही नारळाचे दूध अनेक प्रकारे वापरू शकता. काही प्रकार पुढीलप्रमाणे…

1. नारळाचे दूध कंडिशनर
हे बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा कप नारळाचे दूध आणि दोन चमचे आर्गन तेल एकत्र मिसळायचे आहे. यानंतर हे मिश्रण ओल्या केसांवर लावा. त्यानंतर 20 ते 30 मिनिटे ते तसेच ठेवा. यानंतर  साध्या पाण्याने धुवून टाकू शकता.

2. नारळाचे दूध आणि कढीपत्ता मास्क
नारळाचे दूध आणि कढीपत्त्याचा मास्क बनवण्यासाठी अर्धा कप नारळाचे दूध आणि 10 ते 14  कढीपत्ता पाने घ्यावी. कढीपत्ता घालून गरम करा,  थंड झाल्यावर ते केसांना लावा.

3. नारळाचे दूध आणि मेथीचा मास्क
हा मास्क बनवण्यासाठी अर्धा कप नारळाच्या दूधात दोन चमचे मेथीच्या बियांची पावडर मिसळा. यानंतर, केसांना लावा आणि 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर केस नीट स्वच्छ पाण्याने धुवा.