‘कोडमंत्र’ मंगळवारी

सामना ऑनलाईन । मुंबई

अजय पुरकर आणि मुक्ता बर्वे यांचे मराठीतील ‘कोडमंत्र’ हे नाटक ज्या गुजराती नाटकावरून घेण्यात आलंय ते ‘कोडमंत्र’ हे गुजराती नाटक येत्या मंगळवारी अनंतचतुर्दशीच्या दिवशी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात दुपारी पावणेपाच वाजता दाखवले जाणार आहे. अमरदीप प्रस्तुत या नाटकाची निर्मिती भरत ठक्कर यांनी केली आहे, तर स्नेहा देसाई यांनी ते लिहिले आहे. ‘कोडमंत्र’ म्हणजे नेमकं काय? रोहित राठोड याचा खून सेकंड इन कमांड अश्विन राठोड यांनी खरंच केला का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं या मूळ नाटकातून पाहायला मिळतील.