जम्मू-कश्मीर गारठलं, दाल सरोवर गोठलं

फोटो सौजन्य: एएनआय

सामना ऑनलाईन । जम्मू

हिंदुस्थानच्या उत्तरेकडील राज्यांत तापमानाचा पारा खाली उतरला असून देशात थंडीची लाट आहे. जम्मू कश्मीरमध्ये तर अनेक ठिकाणी पारा ऋणमध्ये पोहोचला असून जगप्रसिद्ध ‘दाल’ सरोवर गोठलं आहे.

गेले काही दिवस थंडी गायब झाली की काय अशी चर्चा सुरू होती. मात्र मंगळवारी रात्री हिंदुस्थानात थंड वारे वाहू लागले आणि तापमान खाली उतरले. जम्मू-कश्मीरमध्ये अनेक भागांत पारा गोठण बिंदूच्या खाली उतरलेला पाहायला मिळाला. प्रसिद्ध ‘दाल’ सरोवर गोठू लागले असून पृष्ठभागावर बर्फ जमा झाल्याचे दिसते.

महाराष्ट्रत गुलाबी थंडी

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आता महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळत आहे.