कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार

3
cold-in-nashik

सामना प्रतिनिधी । मुंबई

पुढील आठवडाभर राज्याच्या वातावरणातील हवेच्या दाबात वाढ होणार आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नगर येथे गारवा राहणार आहे. तसेच कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र ते पूर्व महाराष्ट्रात थंडीची तीव्रता अधिक राहणार आहे.

रविवारी उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट होती. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मागील 24 तासांत नोंदविले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सियस) पुढीलप्रमाणे:

मुंबई (कुलाबा) 16.8,
सांताक्रुझ 12.4,
अलिबाग 13.6,
रत्नागिरी 14.8, पुणे 6.2,
नगर 4.9,
जळगाव 7.4,
कोल्हापूर 15.1,
महाबळेश्वर 12.2,
मालेगाव 6.2,
सांगली 10.4,
सातारा 9.4,
सोलापूर 13.0,
संभाजीनगर 6.4,
परभणी 8.5,
नांदेड 10.5,
बीड 8.5,
अकोला 8.5,
अमरावती 10.4,
बुलढाणा 9.3,
ब्रह्मपुरी 7.9,
चंद्रपूर आणि गोंदिया प्रत्येकी 12.2,
नागपूर 6.3,
वर्धा 10 आणि यवतमाळ 11.0.

सध्या बाष्पयुक्त वाऱयाचा प्रभाव ओसरला आहे. त्याच वेळी उत्तरेकडून येणाऱया थंड वाऱयांमुळे शहरात थंडी पडत आहे. दरम्यान पुढील तीन ते चार दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान वाढणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम

नाशिक जिह्यात आज सलग दुसऱया दिवशी थंडीची तीक्र लाट जाणवत होती. कालच्या तुलनेत एक अंशांनी किमान तापमान वाढले असले तरी गारठा कायम होता. निफाड तालुक्यातील उगावला 1, कळवणला 2.6, कुंदेवाडीत 3, तर नाशिकला 5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.