मुंबईचा पारा 18 अंशावर

मुंबईकरांनी रविवारी पहाटे थंडीचा सुखद अनुभव घेतला. मागील आठवडाभर 22-23 अंशांच्या पातळीवर राहिलेले किमान तापमान अचानक 18 अंशांपर्यंत खाली आले. सांताक्रूझमध्ये 18.9 अंश किमान तापमानाची नोंद झाली. शहरात चालू हंगामात नोंद झालेले हे नीचांकी तापमान असल्याचे कुलाबा वेधशाळेने जाहीर केले. एकीकडे सांताक्रूझच्या तापमानात सरासरीपेक्षा एक अंशाने घसरण झाली, तर कुलाब्यात 21.8 अंश इतके किमान तापमान नोंद झाले. शहरात यापूर्वी 12 डिसेंबरला 19.4 अंश इतके किमान तापमान नोंदवले होते. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला वाढलेला थंडीचा जोर ’थर्टी फर्स्ट’च्या रात्रीपर्यंत कायम राहील. सांताक्रूझ आणि कुलाबा अशा दोन्ही ठिकाणी 18 ते 20 अंशाच्या आसपास तापमान राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.