४८ तासांत कडाक्याची थंडी

सामना ऑनलाईन । नागपूर

विदर्भ, मराठवाडा यांसारख्या महाराष्ट्रातील काही भागात येत्या ४८ तासांत कडाक्याची थंडी पडणार असल्याचे संकेत कुलाबा वेधशाळेने दिले आहेत. गुरूवारी रात्री गोंदीयामध्ये निच्चांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची तर नागपुरात ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या थंडीमुळे विदर्भवासीय चांगलेच हुडहुडले आहेत.

अचानक थंडीचा कडाका वाढल्याने नागपुरातील हुडकेश्वर परिसरातील एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला. बुधवारी सकाळी हुडकेश्वर परिसरातील बंद दुकानाजवळ सुधाकर पिलपिले (६३) हे वयोवृद्ध मृत अवस्थेत सापडले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून अचानक वाढलेल्या थंडीमुळे त्यांचा मृत्यु झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.