सरस्वती मालिकेच्या सेटवरील सरू, देविकाची ऑफ स्क्रीन धम्माल !

सामना ऑनलाईन । मुंबई

कलर्स मराठीवरील सरस्वती या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मालिकेमधील सरू म्हणजेच तितिक्षा आणि देविका म्हणजेच जुई या ऑफस्क्रीन चांगल्या मैत्रिणी असून त्या सेटवर शूटींगदरम्यान बरीच धम्माल करत असतात. तब्बल १२-१३ तास एकत्र काम केल्यानंतर सेटवर एकत्र राहून हे बॉन्डींग बऱ्याच कलाकारांमध्ये पहायला मिळते.

मालिकेमध्ये सरू आणि देविका या दोघींच्या नात्यामध्ये जरी गैरसमज असले तरी देखील मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान या दोघीही सेटवर खेळीमेळीच वातावरण ठेवतात. त्यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या फोटोला मोठ्या प्रमाणावर शेअर आणि लाईक केले जात आहे. या फोटोत जुई म्हणजेच देविका सरुच्या ठमीवर (सायकल) बसून मस्त सेटवर फेरफटका मारत आहे असे दिसत आहे. घरामधली सरस्वती आणि लक्ष्मी जेव्हा आनंदाने नांदते तेव्हा घर कसं छान आणि प्रसन्न राहतं, अस काहीसं हे फोटो बघून वाटते.

sarswati-serial-3

sarswati-serial-1