प्रसिद्ध कॉमेडी कलाकाराला ड्रग्जचा विळखा, आईनेच केला गौप्यस्फोट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘द कपिल शर्मा शो’मध्ये मावशीची भूमिका करणाऱ्या कॉमेडी कलाकारावर त्याच्या कुटुंबीयांनीच तो ड्रग्जच्या आहारी गेल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध कॉमेडी कलाकार सिद्धार्थ सागर हा ४ महिन्यांपासून गायब होता. या प्रकरणी त्याने आपल्या आईवर टॉर्चर केल्याचा आरोप केला. सिद्धार्थच्या आरोपानंतर त्याची आई अल्का सागर यांनी पती शिरीष सागर पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी संपर्क साधला आणि आपल्या मुलाची ‘कामगिरी’ उघड केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अल्का सागर यांनी सिद्धार्थ हा ड्रग्जच्या आहारी गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. ‘सिद्धार्थने केलेल्या आरोपांमुळे दु:खी झाले आहे. परंतु ड्रग्जचा विळख्यात अडकलेला सिद्धार्थ कधी कधी एवढा हिंसक होत होता की तो इतरांना मारहाणही करत होता. तसेच सिद्धार्थ चांगला असून तो त्याच्या सोबतच्या व्यक्तींमुळे तो यात अडकला आहे’, असा आरोप त्यांनी केला.

‘सिद्धार्थ ड्रग्जच्या जाळात इतका अडकला आहे की त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. ड्रग्जमुळे तो घरात सामानाजी तोडफोडही करत होता. त्यामुळे आम्हाला कधी कधी आमच्याच घरात असुरक्षित वाटायचे, असेही अल्गा सागर म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी कॉमेडी कलाकार सिद्धार्थ चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची बातमी आली होती. त्यानंतर सिद्धार्थ सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले होते. तसेच व्हिडीओमध्ये त्याने कुटुंबीयांनी आपल्यासोबत चुकीचे वर्तन केल्याचा आरोप केला होता. तसेच व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर त्याने आपल्या आईवरही गंभीर आरोप केले होते.

right now im in safe hands …will update you guys in 2-3days

A post shared by Sidharth Sagar (@sidharthsagar.official) on