काळ्या यादीत टाकण्याच्या इशाऱयानंतर कंपनी डबल डेकर बस पुरवण्यास तयार

वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही बस पुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱया कॉसिस कंपनीला ‘बेस्ट’ प्रशासनाने काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतर आता या कंपनीने 700 डबलडेकर बस पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. या बस लवकरात लवकर पुरवल्या जातील असे पंपनीने प्रशासला कळवले आहे.

‘बेस्ट’च्या ताफ्यात असलेल्या डबलडेकर बस गाडय़ांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने प्रशासनाने नव्या 900 बसेस भाडेतत्त्वावर निर्णय घेतला आहे. यासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत स्विच मोबॅलिटी आणि कॉसिस कंपनीने प्रतिसाद दिला. 900 इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेसपैकी 200 बसेस स्विच मोबॅलिटी कंपनीने पुरवण्याची तयारी दर्शवली. तर 700 इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्याची तयारी कॉसिस पंपनीने दर्शवली. मात्र दरम्यानच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून बसेसचा पुरवठा करण्यात उशीर झाला. मात्र आता प्रशासनाने या कंपनीला कारवाईचा इशारा दिल्यानंतर आता कंपनीने बस पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.