स्पर्धात्मक परीक्षेची तयारी

संजय मोरे [email protected]

जागतिकीकरणाच्या  या युगात नोकऱ्या नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर आणि लिपिक पदासाठी झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच स्टेट बँकेची प्रोबेशनरी ऑफिसरला 233 पदांसाठी जाहिरात प्रमोट झाली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातूनच चांगल्यातील  चांगली नोकरी मिळविणे ही स्पर्धा परीक्षांची व्यवस्थित तयारी  करणाऱ्या उमेदवारांना कठीण नाही.

स्पर्धा फक्त नोकरी मिळविणा उमेदवारांमध्येच नाही तर बँकांमध्येदेखील चांगल्यातला चांगला उमेदवार निवडण्यासाठी लागली आहे. शिक्षण ही नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यासाठी मूलभूत बाब आहे. त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षांतील अभ्यासाचे तंत्र व त्यामुळे मिळणारे यशही नोकरी मिळविण्यासाठी मूलभूत गोष्ट बनली आहे.

स्पर्धा परीक्षांशिवाय सरकारी नोकरी अशा बँकेतील नोकरी असा समज असेल तर तो तत्काळ मनातून काढून टाका. स्पर्धा परीक्षेशिवाय नोकरी मिळविता येणार नाही. नोकरी ही अभ्यासाविना मिळविता येणार नाही हा परीक्षांबद्दलचा अवेअरनेस वाढत चालला असून स्पर्धादेखील तीक्र होत चालली आहे. स्पर्धा परीक्षेचे तंत्र अवगत केल्यास त्याजोगे चांगले करीयर करता येईल.

स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आपले ज्ञान अद्ययावत ठेवायला हवे. नाहीतर स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार हे वेगळे सांगायची गरज उरलेली नाही.

महत्त्वाकांक्षी उमेदवारांना स्पर्धेच्या या युगात नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे चांगले माध्यम उपलब्ध आहे. अभ्यास आवडत नाही, अभ्यास झेपणार नाही, अभ्यासाचा काहीही उपयोग होत नाही, अशा नैराश्य पदरात पाडणाऱ्या गोष्टींचा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱया उमेदवारांनी विचार करायला नको. तुम्हाला यश मिळवायचे असेल तर अभ्यासाची कास धरा. स्पर्धा कितीही तीक्र असो, मी यश मिळविणारच असा निश्चय करून स्पर्धेला सामोरे जा.

स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश मिळविणे शक्य असते, परंतु अभ्यासात सातत्य न ठेवल्याने यश हुलकावणी देते व त्यामुळेच स्पर्धा परीक्षा ही अवघड परीक्षा आहे. आपण स्पर्धेत टिकू शकत नाही असा समज सर्वांपर्यंत पोहोचला जातो. हे सर्व टाळण्यासाठी काही गोष्टींचा मूलभूत अभ्यास आपणास करायलाच हवा. तो म्हणजे नियमितपणे चांगले व दर्जेदार माहिती पुरविणारे वर्तमानपत्र वाचायला हवे. अवांतर वाचनाची आवड जोपासायला हवी. इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास व गणिताच्या अभ्यासाचा टच ठेवायला हवा. संगणक हा तर मानवी जीवनातील अविभाज्य घटक झाला असल्याने त्याचे ज्ञान वाढवायला हवे. मराठी व हिंदी भाषेबरोबरच इंग्रजी संभाषण कौशल्य वाढविले पाहिजे.

जीवनातील कोणतेही क्षेत्र असो, तत्परता, निश्चित ध्येय, समर्पण, दक्षता, जबरदस्त इच्छाशक्ती, अद्ययावत ज्ञान, सकारात्मक दृष्टिकोन व सातत्य हे समजून योग्य रीतीने घेतलेले अविरत परिश्रम यामुळे तुम्हाला यशाची चव चाखायला नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास म्हणजे एक प्रवास असून या प्रवासाचा आनंद घेणारा यश मिळवितो हे लक्षात घ्या.

बदल ही एकमेव न बदलणारी गोष्ट आहे. या उक्तीनुसार स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेत पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा असा एक मुख्य बदल करण्यात आलेला आहे. पूर्वपरीक्षा साधारणपणे जून महिन्यात होणार आहे. या भरती प्रक्रियेत एकूण तीन टप्पे आहेत. यात पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, गट चर्चा व मुलाखत असे तीन टप्पे आहेत.

या परीक्षेनंतर लगेच वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) टेस्ट होणार त्यासाठी ५० गुण ठेवण्यात आलेले आहेत. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.

परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने केल्यास यश मिळवणे अवघड होणार नाही. अभ्यासाच्या धोरणाबरोबरच नियोजनालाही फार महत्त्व आहे. अभ्यासाचे वेळापत्रक, प्रश्नांचा सराव व प्रश्नपत्रिका सोडविताना पाळायचे बंधन या सर्वांचा विचार करा व अभ्यासाच्या तयारीला लागा.