लाठीमाराच्या निषेधार्थ पडेगाव-मिटमिटामध्ये कडकडीत बंद

सामना ऑनलाईन,संभाजीनग

शहरातील घनकचऱ्याच्या गाड्या अडविल्यानंतर पोलिसांनी पडेगाव-मिटमिटा परिसरातील नागरीकांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून पडेगाव-मिटमिटा येथील नागरिकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या बंदला परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शहरातील कचरा मिटमिटा परिसरातील अप्पावाडी लोकवस्तीच्या पुढे एका खासगी मालकीच्या ५ एकरांवर टाकण्यासाठी वाहने घेऊन जात असताना मिटमिटा परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. आंदोलनकत्र्यांवर जोरदार लाठीचार्ज करून पांगविण्यात आले. पोलिसांनी परिसरातील जवळपास १७ महिलांसह ७० नागरिकांना ताब्यात घेतले होते.  त्यामुळे नागरिकांनी बंदचे आवाहन केले. या अवाहनाला परिसरातील मिटमिटा, पडेगाव, सैनिक कॉलनी, चिनार गार्डन, तारांगण कासलीवाल, अर्चअंगन, पोलीस कॉलनी, प्रिया कॉलनी, सुंदरनगर आदी भागातील सर्वच दुकाने, व्यापारी संकुलातील दुकाने बंद करून सहभागी झाले आहे.