साबणामुळे आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला धोका

सामना ऑनलाईन । लॉस अँजेलिस

साबण, लोशन यांच्यातील रसायने आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी हानीकारक ठरू शकतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे्.

ट्राइक्लोकार्बन (टीसीसी) हा दूषित पाण्यात आढळणाऱ्या दहा प्रमुख घटकांपैकी एक घटक आहे. साबण, लोशन तयार करणाऱ्या अनेक कंपन्या जे पाणी निर्मिती प्रक्रियेदरम्यान वापरतात त्यामधून साबण, लोशन यांच्यात ट्राइक्लोकार्बन (टीसीसी) हा घटक मिसळतो. त्यामुळे टीसीसी मिसळलेला साबण अथवा लोशन यांचा वापर गरोदर महिलेने केल्यास आईच्या त्वचेच्या छिद्रातून काही प्रमाणात घातक दूषित घटक थेट गर्भापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. काही बाळामध्ये जन्मतःच काही दोष निर्माण होऊ शकतात, असे अमेरिकेतील लॉरेन्स लिवरमोर लॅबच्या संशोधकांनी सांगितले.

गरोदर महिलेने तिच्या तसेच बाळाच्या सुरक्षेसाठी स्वस्तातील साबण अथवा लोशन वापरण्याऐवजी डॉक्टरांनी सांगितलेले दर्जेदार साबण, लोशन यांचाच वापर करावा असे लॉरेन्स लिवरमोर लॅबच्या संशोधकांनी सांगितले.