विसर्जन मिरवणुकीत दगडफेक, मूर्तीच्या विटंबना प्रकरणी काँग्रेस नगरसेवकाला अटक


सामना प्रतिनिधी । पुणे

मुंबईसह राज्यभरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा घोषणा देत बाप्पाला निरोप देण्यात आला. याच दरम्यान अनेक ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याच्या घटना घडल्या.

पुण्यात कासेवाडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाजप नगरसेविकेचा पती आणि काँग्रेस नगरसेवकामध्ये वाद झाला होता. याच वादातून विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीमध्ये गणेशाच्या मूर्तीची विटंबना झाली. तसेच ट्रॅक्टर चालक आणि साऊंड वाल्याला देखील मारहाण करण्यात आली. दगडफेकीमध्ये साऊंडचेही नुकसान झाले. या प्रकरणी सोमवारी काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक करण्यात आली आहे. खडकी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

बंदी? छे!!! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू
बेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक
खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार