नागपुरात जुगार खेळताना काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूरमध्ये जुगार खेळताना काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. नागपुरातील वॉर्ड क्र.२०चे नगरसेवक असणारे रमेश पुणेकर यांना पोलिसांनी जुगार खेळाताना रंगेहात पकडले आहे. पुणेकर यांच्यासोबत शहरातील प्रतिष्ठीत अशा २० व्यापाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोतीबाग परिसरामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानंतर पाचपावली स्थानक पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकले तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक पुणेकर आणि २० व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य आणि ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे पुणेकर यांना दुसऱ्यांदा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आता या नगरसेवकावर पक्ष काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.