काँग्रेसचा एक्झिट पोलवर विश्वास नाही

71
गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मल्लिकार्जुन खरगे 42 हजार मतांनी पिछाडीवर आहे

सामना प्रतिनिधी । मुंबई

सध्या टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात येत असलेल्या एक्झिट पोलमध्ये कोणतीही सत्यता नाही. काँग्रेस पक्षाच्या खासदार व आमदारांशी आम्ही चर्चा केली पण आम्ही एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्झिट पोलवर अविश्वास दर्शवला.

खरगे पत्रकारांशी बोलत होते. एक्झिट पोलमध्ये कोणतीही सत्यता नाही. आमच्या पक्षाचे खासदार व आमदारांनी एक्झिट पोलचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे आमचा त्यावर अजिबात विश्वास नाही असे खरगे म्हणाले.  

कोण कोण आले नाहीत?

विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीला 10 ते 12 आमदारांनी पाठ फिरवली. राधाकृष्ण विखे-पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, नीतेश राणे या आमदारांनी बैठकीला दांडी मारली. काही आमदार आजारपणाचे कारण देत बैठकीला गैरहजर राहिले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे परदेशात असल्याने ते बैठकीला येऊ शकले नाहीत. या बैठकीत खरगे यांनी आमदारांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या