प्रिंयका गांधींचा लखनौमध्ये रोड शो, जोरदार शक्तीप्रदर्शन

35
roadshow-in-lucknow
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । लखनौ

काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रियंका गांधी-वढेरा या आज लखनौमध्ये पहिला रोड शो करत आहेत. या रोड शोसाठी तुफान गर्दी जमली आहे. काँग्रेसचं हे शक्तीप्रदर्शन असून लोकसभा निवडणुकीसाठीचा शंख फुंकण्यात आल्याचे म्हणणे आहे. लखनौ विमानतळ ते काँग्रेसचे पक्ष कार्यालय असा 15 किमीचा हा रोड शो दोन ते तीन तास चालेल असे सांगण्यात येत आहे.

28 वर्षांत जिंकता न आलेलं लखनौ प्रियंका गांधींनी पहिल्या रोड शोसाठी का निवडलं?

विशेष म्हणजे या रोड शोवेळी बसवर उभे असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हातात राफेल विमानाची प्रतिकृती होती. राफेलवरून काँग्रेसने मोदी सरकारचा पाठ न सोडण्याचा निश्चय केल्याचे येथेही पाहायला मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या