राहुल गांधी अमेठीतून पराभूत, सिद्धू राजकारणातून निवृत्ती स्विकारणार का?

66

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पारंपारिक मतदारसंघ अमेठी आणि केरळमधील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी राहुल गांधी जर अमेठीतून हरले तर राजकारणातून निवृत्ती स्विकारेन अशी भीमगर्जना केली होती. आता राहुल गांधी अमेठीतून हरल्यावर नेटकर्‍यांनी सिद्धूच्या या वक्तव्याची आठवण करून दिली आहे.

… तर राजकारण सोडून देईल, नवज्योत सिंह सिद्धूचा निर्धार

29 एप्रिल रोजी सिद्धू यांनी राहुल गांधी हे अमेठीतून जिंकणारचा असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच भाजप उमेदवार स्मृती इराणी या राहुल गांधींना टक्कर नाही देऊ शकत असेही सिद्धू म्हणाले होते. परंतु नुकतंच अमेठीचे निकाल हाती आले. त्यात स्मृती इराणी विजयी झाल्या. यासाठी राहुल गांधींनी इराणींचे अभिनंदनही केले.

नेटकर्‍यांनी आता सिद्धूला लक्ष्य केले असून जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. भाजपच्या कार्यकर्त्या अमृता भिंदर यांनी सिद्धूची बातमी रीट्विट करून तुम्ही आपला शब्द पाळणार का हे पाहते असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या