पाहा व्हिडीओ : काँग्रेस आमदाराची भाजप नेत्याला मारहाण

सामना ऑनलाईन । धार

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात काँग्रेस आमदार उमंग सिंगार यांनी एका भाजप नेत्याला सर्वांदेखत मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धार जिल्ह्यातील टांडा गावात वीजेची तार तुटल्याने शॉक लागून एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. त्या मुलीच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. त्या मदतीचा चेक देण्यासाठी उमंग सिंगार हे गावात आले होते. त्यावेळी सिंगार आणि स्थानिक भाजप नेते प्रदीप गादीया यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर सिंगार यांनी गादीया यांना मारहाण केली. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सिंगार यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

summary :  Congress MLA Umang Singhar attacks a BJP leader in Dhar.