Video-आमदार हरिभाऊ राठोड यांचा काँग्रेसला घरचा आहेर

2

सामना ऑनलाईन । नागपूर 

माजी खासदार आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. “महाराष्ट्रात सामाजिक भान असणारे नेते उरले नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचे चुकीचे निर्णय घेतले जातात”. अशी अप्रत्यक्षपणे टीका हरीभाऊ राठोड यांनी काँग्रेसवर केली आहे. “भविष्यात जो पक्ष सामाजिक समीकरणं बघणार नाही, जो पक्ष सोशल इंजिनिअरींग करणार नाही, त्याला भवितव्य उरणार नाही, मग तो कोणताही पक्ष असो, तो टिकणार नाही ” असे खडे बोल राठोड यांनी सुनावले आहेत.

आमदार हरिभाऊ राठोड यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सूक होते. मात्र काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने  राठोड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी चंद्रपूर, हिंगोलीतूनही निवडून आलो असतो, माणिकराव ठाकरे ज्येष्ठ नेते आहेत, पक्षाने घेतलेला निर्णय मान्य असल्याचे सांगत दुसरीकडे त्यांनी पक्षावररच टीका केली आहे.