रत्नागिरीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

देशात आणि राज्यात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती अन्य जीवनावश्यक वस्तूच्या वाढलेल्या किंमती याविरोधात आज रत्नागिरीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला.

काँग्रेस भवन येथून मोर्चाचा सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा येताच त्याठिकाणी निदर्शने करण्यात आली. मोर्चात मनसे आणि आरपीआयने सहभाग घेतला. यामोर्चात आमदार हुस्नबानू खलिफे, माजी जि.प.अध्यक्ष राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये, सुदेश मयेकर, हरीस शेकापनं, अशोक जाधव व इतर पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यामध्ये मे २०१४ नंतर शासनाने पेट्रोलच्या करात २११ टक्के वाढ केली. तसेच डिझेलच्या करात ४४३ टक्के वाढ केलेली आहे. केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल व डिझेलवर अवास्तव कर लावल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढलेल्या आहेत, असा आरोप केला. कोकणात १३ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने व्यापाऱ्यांनी बंद पाळला नाही.