सुजय यांचा भाजप प्रवेश दुर्दैवी – अशोक चव्हाण

सामना प्रतिनिधी । नांदेड

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू केले असून ते उचित नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली असून सुजय पाटील यांचा भाजप प्रवेश ही दुर्दैवी बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

येथे पत्रकारांशी बोलताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, सुजय पाटील यांचा आज भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला ही दुर्दैवी बाब आहे. भाजपचे हे फोडाफोडीचे राजकारण उचित नसल्याचे चव्हाण म्हणाले.