Pulwama Attack जवानांना श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यावर पैशांची उधळण

सामना ऑनलाईन, हरीद्वार

परिस्थितीचं अजिबात गांभीर्य नसलेल्या हरीद्वारमधल्या काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आचरटपणाची हद्द केली. पुलवामा यथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कव्वाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा मुलगा वीरेंद्र रावत यांच्यावर पैसे उडवण्यात आले. या कार्यकर्त्यांना रोखण्याऐवजी वीरेंद्र रावत हसत होते.


पैसे उडवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर वीरेंद्र रावत यांनी हा कार्यक्रम जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि 56 इंचाची छाती असलेल्यांना जागं करण्यासाठी होता असं सांगितलं. एकीकडे काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुलवामा हल्ल्यानंतर असंवेदनशीलपणे वागत असल्याचा आरोप करीत आहे, मात्र त्यांचे नेते हे कॅमेऱ्यासमोर असंवेदनशीलपणे जाहीर प्रदर्शन करीत आहेत. यामुळे ट्विटरवरून लोकांनी या काँग्रेस नेत्यांना झोडपून काढायला सुरुवात केली आहे.