सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, पोटदुखीने त्रस्त

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पोटदुखीचा त्रास असह्य झाल्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (७१) यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या सोनिया यांची तब्येत बिघडली. त्रास वाढल्याने त्यांना सिमला येथून तातडीने दिल्लीला आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज (शुक्रवारी) संध्याकाळी पाच वाजता सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिली आहे. याआधी खांदादुखी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे एकदा सोनिया गांधी यांनी सर गंगाराम रुग्णालयात उपचार करुन घेतले होते.