काँग्रेसचे प्रियंका कार्ड फेल, अमेठीतून राहुल गांधी पराभूत

64
priyanka-rahul-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्यासाठी पक्षाने प्रियंका गांधींना सक्रिय राजकारणात उतरवले. परंतु काँग्रेसचे प्रियंका कार्ड फेल झालेले दिसत आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ रायबरेली आणि अमेठीतही जिंकताना पक्षाला नाकी नऊ आले. रायबरेलीतून सोनिया गांधी जिंकतना दिसत आहे. परंतु अमेठीत खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना स्मृती इराणींनी कडवी झुंज दिल्याने ते पराभूत झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपची युती झाली होती. तरी राहुल गांधी आणि सोनिया गांदींच्या मतदारसंघात उमेदवार न देण्याचे मायावतींनी जाहीर केले होते. ही खेळीमुळे तरी काँग्रेसला फायदा होईल असे म्हटले जात होते परंतु ती आशाही फोल ठरली आहे.

मोदी शहाच्या जोडीला हरवण्यासाठी काँग्रेसने चंग बांधला होता. पक्षातच प्रियंका गांधी लाव देश बचाओ अशा आरोळ्या ठोकण्यात आल्या होता. सुरूवातीला पक्षश्रेष्ठींनी ही बाब दुर्लक्ष केली. नंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने प्रियंका गांधींचा राज्याभिषेक करून महासचिवपदी बसवले. प्रियंका गांधीनींही रायबरेली, अमेठी सोडून इतर ठिकाणीही काँग्रेसचा प्रचार केला. परंतु त्यात ते सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या