राजस्थान, गुजरातसह अनेक राज्यांत काँग्रेसचा सुपडा साफ

47
rahul-gandhi-sad

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणीत एनडीएने काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. राजस्थान, गुजरातसह जवळपास 14 राज्यांमध्ये काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश,अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यांत काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही.

2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही एनडीएला भरघोस यश मिळाले आहे. तर काँग्रेसला काही राज्यांतून हद्दपार करण्यात आले आहे. राज्यस्थानामध्ये काँग्रेसची सत्ता असूनही भोपळा देखील फोडता आलेला नाही. तर सर्वच्या सर्व 25 जागांवर भाजचे उमेदवार विजयी झाले आहेत. तेसच गुजरातमध्ये देखील 26 पैकी 26 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.  दिल्लीतही काँग्रेसचा सुपडा साफ झालाअसून, हरयाणातील सर्वच्या सर्व 10 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. उत्तराखंडातही काँग्रेसला भोपळा मिळाला असून सर्व 5 जागांवर भाजपच्या खिशात घातल्या आहेत.हिमाचल प्रदेशातील देखील 4 पैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. जम्मू कश्मिरमध्येही काँग्रेसला खातं उघडता आलेले नाही.

बिहारमध्ये 40 पैकी फक्त एका जागेवर काँग्रेस उमेदवार निवडून आला आहे. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. यापैकी 22 जागांवर वायएसआर काँग्रेस, तर टीडीपीला 3 जागा मिळाल्या आहेत, मात्र येथेही काँग्रेसला खातं उघडता आले नाही. ओडिशातील एकूण 21 जागांपैकी 12 जागांवर सत्ताधारी बिजू जनता दल, तर 8 जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला केवळ 1 जागेवर यश मिळाले आहे. महाराष्ट्रत मागिल निवडणुकीत दोन जागा मिळवलेल्या काँग्रेसला यावेळी केवळ एकच जागा राखता आली आहे. तसेच उत्तर प्रदेश 80 पैकी 1, मध्य प्रदेशात 29 पैकी 1, झारखंड- 14 पैकी 1 , पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 2,  ओदिशा- 21 पैकी 1अशा जागा मिळाल्या आहेत

.

आपली प्रतिक्रिया द्या