शत्रुघ्न सिन्हा हे लालूंचे दलाल! काँग्रेस कार्यकर्त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी

94
काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा पाटणा साहीब मतदारसंघातून निवडणूक लढवत असून ते 74 हजार मतांनी पिछाडीवर आहेत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे शत्रुघ्न सिन्हा हे राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादवांचे दलाल आहेत, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या उमेदवारीवर नाराज असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका गटाने पाटण्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे. सिन्हा यांची उमेदवारी रद्द करावी, अशी या गटाची मागणी आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपमधून बाहेर पडून शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसची वाट धरली. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी पटना साहिब इथून तिकीटही मिळालं. पण, काँग्रेसचे काही कार्यकर्ते सिन्हा यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजदच्या सांगण्यावरून सिन्हा यांना उमेदवारी मिळाली आहे. तसंच बिहार प्रदेश काँगेस समिती (बीपीसीसी)चे अध्यक्ष मदन मोहन झा, पक्षाचे नेते शक्ती सिंह गोहिल आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह या तिघांनी मिळून ही सीट विकली आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा हे लालू प्रसाद यादव यांचे दलाल आहेत, असा आरोप करत या कार्यकर्त्यांनी सोमवारी पाटण्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

शत्रुघ्न सिन्हा हे सध्या पटना साहिबमधूनच खासदार आहेत. 2014मध्ये त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी झाले होते. मात्र, यंदा 2019च्या लोकसभा निवडणुकांवेळी मात्र सिन्हा हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे त्यांची पत्नी पूनम सिन्हा याही समाजवादी पक्षाकडून लखनौ इथून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या