Lok Sabha 2019 तिकीट न मिळाल्याने काँग्रेस नेत्याने जाळलं पक्षाचं प्रचार साहित्य

3

सामना ऑनलाईन । हैदराबाद

लोकसभा निवडणूकीचे तिकीट न मिळाल्याने तेलंगणातील काँग्रेस नेत्याने पक्षाच्या झेंड्यासही प्रचाराच्या साहित्याला आग लावल्याचे समोर आले आहे. मन्नी कृशांक असे त्या नेत्याचे नाव असून त्याने सुमारे पंधरा लाखाचे प्रचार साहित्य जाळल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मन्नी कृशांक हा माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते सर्व सत्यनारायणा यांचा जावई असल्याचे समजते. कृशांक हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये असून तो तेथील एक प्रसिद्ध दलित नेता आहे. कृशांक हा ओस्मानिया विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर आहे. उच्चशिक्षित असलेल्या कृशांकला काँग्रेसकडून पेडापल्ली मतदारसंघातून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती मात्र काँग्रेस त्या मतदार संघातून काँग्रेसने ए चंद्रशेखर या नेत्याला तिकीट दिले. त्यामुळे संतापलेल्या कृशांकने काँग्रेस कार्यालयातील प्रचार साहित्य जाळून टाकले. ‘पेडापल्ली मतदार संघ हा दलितांसाठी राखून ठेवला होता त्यामुळे मला तिथून उमेदवारी मिळेल याची खात्री होती’ असे कृशांकने सांगितले. मात्र तिकीट दुसऱ्या नेत्याला जाहीर झाल्यानंतर त्याने काँग्रेसचे प्रचाराचे सर्व प्रचार साहित्य काँग्रेस कार्यालयासमोर जाळले. त्यानंतर कृशांकने सोमवारी तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते केटी रामाराव यांची भेट घेत टीआरएस या पक्षात प्रवेश केला.