गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तिसऱ्यांदा जाळपोळ,टँकर, दोन सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन पेटवली

1
Naxals have set ablaze 27 machines
फाईल फोटो

सामना ऑनलाईन, नागपूर

गडचिरोलीत महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात क्विक रिस्पॉन्स टीमचे 15 जवान शहीद झाले. त्यानंतर नक्षलवाद्यांकडून जाळपोळीच्या घटना सुरूच असून रविवारी पुन्हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या सुरू असलेल्या कामावरील टँकर, दोन सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन, रोडरोलर आणि इतर साहित्याची जाळपोळ केली.

या परिसरातील ही तिसरी घटना आहे. एट्टापल्ली तालुक्यातील येमली-मंगुठा या मार्गाचे काम सुरू होते. या ठिकाणी नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यवतमाळच्या ठेकेदाराचे या घटनेत प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नक्षलवाद्यांनी जिह्यातील दुर्गम भागात हत्या, जाळपोळीचे सत्र सुरूच ठेवले असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.