पुणे : संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद, पोलिसांनी हटवला पुतळा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानात संभाजी ब्रिगेडने छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आल्याचे समोर आल्याने पोलिसांनी धावपळ सुरू झाली.

मंगळवारी सकाळी जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचे दिसून आले. याची माहिती पोलिसांना मिळाला असता त्यांची धावपळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पुतळा हटवला. मात्र यामुळे वाद निर्माण झाला आहे.

राम गणेश गडकरी यांचा पुतळा ज्या ठिकाणावरून काढला त्या ठिकाणी बसवण्यात आला होता. गडकरी यांचा पुतळा 1 जानेवारी, 2017 ला हटवण्यात आला होता आणि नदीत फेकून देण्यात आला होता.