पाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स

54
bharat-film-flag

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडचा दबंगस्टार सलमान खान याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करो किंवा न करो पण त्याच्या चित्रपटाची चर्चा अधिक होते. त्यामुळेच त्याचा आगामी चित्रपट ‘भारत’चे प्रमोशन सध्या जोरात सुरू आहे. सलमानच्या या फिल्मच्या टीझरचा फर्स्ट व्हिडीओ निर्माता अतुल अग्निहोत्री याने आपल्या ट्विटर हँडलवरून जारी केला आहे. पंजाबच्या ढोल-नगऱ्यांचा ठेका असलेलं संगीत मागे सुरू आहे, सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र दिसत आहे आणि त्यावर Coming Soon स्माइलीसह झळकतं. त्यानंतर हिंदुस्थानचा तिरंगा घेऊन नाचाणाऱ्या लोकांचे हात दिसतात. मात्र हा पूर्ण टीझर नाही तर टीझर काही भाग आहे. लवकरच म्हणजे 26 जानेवारी रोजी संपूर्ण टीझर झळकणार अशी चर्चा आता रंगली आहे.

सलमान खान, कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटाणी, सुनील ग्रोवर या प्रमुख कलाकारांसह दिग्दर्शक अली अब्बास जफर हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू असून पहिलं पोस्टर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झळकलं. त्यानंतर शूटिंग दरम्यानचा एक फोटो अग्निहोत्रीने आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला होता. मग सलमानच्या हाफ पँटवर क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला. आता संपूर्ण टीझरकडे सगळ्यांचे लक्षं लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या