तेलंगणातील दरोडाप्रकरणी मुंबईत पती-पत्नीला अटक

सामना ऑनलाईन, मुंबई

तेलंगणातील रामचंद्रपुरम येथील मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयात दरोडा टाकून धारावीत येऊन लपलेल्या राधा आणि सुंदर कनागला या दांपत्याला मुंबई क्राइम ब्रँचने पकडले.

मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकल्याप्रकरणी राधा आणि सुंदर यांच्या विरोधात तेलंगणाच्या रामचंद्रपुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई क्राइम ब्रँच युनिट-५च्या पथकाने त्या दोघा आरोपींना पकडून तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात दिले.