लग्न करून प्रेमी युगुलाची आत्महत्या, वाशिममध्ये खळबळ


सामना ऑनलाईन । वाशिम

वाशिम शहरातील शुक्रवार पेठेत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आशिष ठाकूर (28) आणि कान्होपात्रा राऊत (22) या दोघांनी बंद असलेल्या आखाड्यामधे गळफास लाऊन आत्महत्या केली. आशिष आणि कान्होपात्रा यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र घरच्यांचा विरोध असल्यामुळे दोघांनी गळफास लाऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाशिम येथिल महाराणा प्रताप चौकाजवळच आशिष आणि कान्होपात्रा एकमेकांच्या शेजारी राहत होते. दोघांचेही एकमेंकावर प्रेम होते. परंतू त्यांच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला होता. सोमवारी पहाटे दोघांनीही एका बंद असलेल्या आखाड्यामधील लोखंडी खांबाला दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. दरम्यान, कान्होपात्राच्या गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवे आणि भांगामधे कुंकू भरलेले आढळून आल्याने दोघांनी आत्महत्येपूर्वी लग्न केले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.