दांपत्य बील न भरता पळाले

 सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या दोघांनी बील न भरता पोबारा केला आहे. रत्नागिरी शहरातील हॉटेल सफारी एशिया मध्ये हि घटना घडली असून आज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशोधन राणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रोहित म्हस्कर आणि आरोही म्हस्कर रा.ठाणे हे दोघेजण १६ सप्टेंबर रोजी सफारी एशियामध्ये राहण्यासाठी आले.त्यांनी १३ हजार रुपये ऍडव्हान्स भरले होते. २८ सप्टेंबर पर्यंत १४ दिवसांचे त्यांचे ३९ हजार ८२७ रुपये बील झाले.मात्र उर्वरित बील न भरताच त्यांनी २८ सप्टेंबरला पोबारा केल्याची तक्रार यशोधन राणे यांनी केली आहे.