१८ वर्षांपासून ते गोरिलासोबत राहतायत!

सामना ऑनलाईन । पॅरिस

घरात कुत्रे, मांजर, पोपट पाळणारे लोक तुम्ही पाहिले असतील. पण कुणी भलामोठा गोरिला माकड पाळल्याचे पाहिले आहे का? फ्रान्समध्ये राहणारे पियरे आणि एलेने हे दाम्पत्य गेल्या १८ वर्षांपासून एका गोरिलाचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करीत आहेत.

या मादी गोरिलाचे नाव डिजिट असे असून गेल्या १३ वर्षात हे दाम्पत्य घराबाहेर गेलेलेच नाही. आम्ही बाहेर गेलो तर डिजिटला वाईट वाटेल असे पियरे यांचे म्हणणे आहे. डिजिट आता खूपच मोठी झाली असून तिच्या राहण्यासाठी आणि झोपण्यासाठी वेगळी व्यवस्था देखील करण्यात आली आहे.