…म्हणून त्यांनी केले कोर्टाऐवजी बाथरुममध्ये लग्न

सामना ऑनलाईन । न्यू जर्सी

लग्न म्हणजे आयुष्यातील आनंदाच आणि अविस्मरणीय क्षण असतो. लग्नात नवरा-नवरी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात. आपले लग्न एखाद्या वेगळ्या ठिकाणी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. एका जोडप्याने चक्क कोर्टाऐवजी बाथरुममध्ये लग्न केल्याची घटना अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये घडली आहे.

न्यू जर्सीतील मॉनमाऊथ काऊंटी या ठिकाणी राहणाऱ्या ब्रायन आणि मारिया यांनी २ जानेवारीला कोर्टामध्ये लग्न करण्याचे ठरवले. ठरल्या वेळेप्रमाणे ते दोघेही लग्न करण्यासाठी कोर्टामध्ये पोहोचले. तिथे पोहचल्यानंतर मात्र अचानक नवऱ्याच्या आईच्या श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यानंतर कोर्टाच्या अधिकाऱ्याने त्यांना ताबाडतोब बाथरुममध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर ब्रायनच्या आईला ऑक्सिजन लावण्यात आला.

आईला बरे वाटत नसल्याने ब्रायन आणि मारिया काही काळ त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आज लग्न झाले नाही तर ४५ दिवस मॅरेज लायसन्साठी थांबावे लागेल अशी माहिती कोर्टातील एका व्यक्तीमार्फत समजली. त्यातच अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे नवऱ्याच्या आईने या विवाहसाठी लागणाऱ्या काही पेपर्सवर सही केली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत हा विवाह होणे अशक्य होते. त्यामुळे या जोडप्याने कोर्टातील अधिकाऱ्यांना बाथरुम मध्ये बोलवून लगेचच आपले लग्न उरकले. या विशेष लग्नाचे काही फोटो कोर्टाच्या काही अधिकाऱ्यांनी फेसबुकवर पोस्ट केले असून ते सध्या व्हायरल होत आहेत.